राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; मराठवाड्यासह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट District Rain Yellow Alert

District Rain Yellow Alert मित्रांनो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात, विशेषतः मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात, मोठं नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचं संकट निर्माण झालं असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. यातच, हवामान विभागाने (IMD) एक चिंता वाढवणारा इशारा दिला आहे की, पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

पुढील ४८ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा District Rain Yellow Alert

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ ते ४८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Gold Price Drop
सोने-चांदीचे दर घसरले! दसऱ्यानंतर मोठी विश्रांती; दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त होणार? Gold Price Drop

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत खालील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे:

  • मराठवाडा: नांदेड वगळता मराठवाड्यातील सर्व ७ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
  • विदर्भ: विदर्भातील गडचिरोली, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
  • पश्चिम महाराष्ट्र: सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
  • उत्तर महाराष्ट्र: उत्तर महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Havaman andaj
राज्यातील या जिल्ह्यात पुढील २४ तासांचा मुसळधार पाऊस हवामान अंदाज Havaman andaj

Leave a Comment